breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘व्हीव्हीपॅट’ जनजागृती मोहिमेस प्रारंभ; राजकीय नेत्यांची ‘पाठ’!

पुणे ( महा ई न्यूज ) –  आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसोबत (ईव्हीएम) व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. त्याबद्दल राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांना व्हीव्हीपॅट विषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या वेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट विषयी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आला.

व्हीव्हीपॅट-ईव्हीएम प्रणालीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने खासदार, आमदार व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या वेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात चार जानेवारीपासून ४५ दिवस जनजागृती केली जाणार आहे. त्या माध्यमातून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत लोकांच्या शंकांचे निरसन केले जाणार केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

बैठकीत ईव्हीएमआणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. व्हीव्हीपॅट हे मतदानाची पोचपावती देणारे यंत्र असून, त्यामुळे मतदारांचा संभ्रम दूर होणार आहे, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. खडकवासला मतदार संघातून ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेचा प्रारंभ होणार आहे. दरम्यान, मोबाइल जनजागृती व्हॅनचे उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार आहे. याबाबत राजकीय पक्षांमधील संभ्रम असून, ते दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वी व्हीव्हीपॅट-ईव्हीएमचे प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याकडे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली होती. त्यापोर्शभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी पुन्हा प्रशिक्षणाचे आयोजन केले. मात्र, पुन्हा अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधींनी उपस्थित न राहता आपले प्रतिनिधी पाठवले होते. त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये व्हीव्हीपॅट- ईव्हीएमबाबत उदासीनता दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button