breaking-newsमुंबई

मुंबईत हाय टाईडचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने रविवारी मुंबईत हाय टाईडचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12 वाजून 23 मिनिटांनी भरतीची शक्यता असून 4.7 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचाही अंदाज वर्तवला आहे. 

मुंबईत सकाळपासूनच पाऊस सुरु आहे. एकीकडे मान्सून शहरात आणि राज्यात स्थिरावत असतानात दुसरीकडे मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सखल भागांत पाणी साचत असल्याचं चित्र आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे. पुढील चार दिवस मुंबई आणि आसपासच्या भागांना हवामान विभागाने सावधानतेचा, सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button