breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत ३ वर्षीय चिमुरडीवर दोन अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईत एका चिमुकलीवर २ अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घ़टना उजेडात आली आहे. देशभर विविध ठिकाणाहून बलात्काराच्या बातम्या येत असताना मुंबईतील ही घटना मनाला चटका लावणारी आहे. याप्रकरणी आरोपींवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. एएनआय या वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारात वाढ होताना दिसतेय. त्यातच, बलात्कार, सामूहिक बलात्कारांच्या घटनांनी देश हादरून निघतोय. अशातच मुंबईतील ३ वर्षांच्या चिमुरडीवर २ अल्पवयीन मुलांनी बल्ताकार केला. यामुळे मुंबईत खळबळ माजली आहे. कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याबाबत तपास करत आहेत. आरोपींनी हा गुन्हा का केला? पीडित मुलीला ते कधीपासून ओळखत होते याचा तपास सध्या सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button