breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन
नवी दिल्ली – राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. अशातच नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाने एका केंद्रीय मंत्र्याचा बळी घेतला आहे. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भुषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी ट्वीटकरुन कोरोनाची लागण झाल्याची माहिती देली होती. ते ६५ वर्षांचे होते.