breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत १,६२५, पुण्यात १,७३९ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १४,६५,९११ वर

मुंबई | देशभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक झपाट्याने वाढतेय. मंगळवारी आढळलेल्या 12 हजार 258 नव्या रुग्णांसह राज्याची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 14 लाख 65 हजार 911 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 370 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावल्याने कोरोनाबळींचा आकडा 38 हजार 717 इतका झाला आहे. तसेच एका दिवसात 17 हजार 141 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने राज्यात आतापर्यंत एकूण 11 लाख 79 हजार 726 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 2 लाख 47 हजार 023 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत मंगळवारी कोरोनाचे 1 हजार 625 नवे रुग्ण आढळले, तर 47 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 लाख 17 हजार 113 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 9 हजार 202 इतका झाला आहे. तसेच मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 976 इतकी झाली आहे.

त्याचबरोबर दररोज २ ते ३ हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात केवळ 1 हजार 739 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 96 हजार 990 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 6 हजार 925 इतका झाला आहे. तसेच मंगळवारी दिवसभरात 2 हजार 152 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 56 हजार 845 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी आढळलेल्या 1 हजार 739 नव्या रुग्णांपैकी 643 रुग्ण पुणे शहरातील असून 449 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button