आरोग्यताज्या घडामोडी

रेजरचा वापर त्वचेसाठी पडू शकतो महाग…कशी घ्याल काळजी ?

महिला असो अथवा पुरूष आपल्या हात -पायावरील केस काढण्यासाठी किंवा पुरुष शेवींग करताना काढण्यासाठी रेजरचा वापर करत असतात. कारण प्रत्येकवेळी पार्लरला जाणं शक्य नसतं. पण याचा परिणाम असा होतो की तुम्ही ज्या भागावरचे केस काढण्यासाठी रेजर वापरत आहात त्या भागाच्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवत असतता. खाज येणे, त्वचा लाल होणे, सुज येणे हा त्रास सहन करावा लागतो. जर तुम्हाला सुद्धा प्रायवेट पार्टसवरचे केस काढताना त्रास होत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

शेविंग करताना अनेकदा घाईत असतान ड्राय शेव केली जाते. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकता. नंतर अनेक दिवस तुम्हाला खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. तसंच केस खडबडीत होऊ शकतात म्हणून ड्रायशेव करणं टाळावं. शेव करण्याआधी त्वचेवर क्रिम अप्लाय करून मगचं शेव करा.

अवयवांवरील केस काढत असताना ते योग्य दिशेने काढायाला हवेत. ज्या दिशेने तुमच्या केसांची वाढ होत आहे. त्याच्या विरूध्द बाजूने केस काढल्यास फायदेशीर ठरेल. कारण ज्या बाजूने केस उगवतात त्याच बाजूने शेव केल्यास व्यवस्थित केस उगवणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणची त्वचा कोरडी सुद्धा पडू शकते.

कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही वॅक्स करताना शेव्हिंग जेलचा किंवा शॅम्पूचा वापर करू शकता. असं केल्याने रेजरही स्कीनवर सहजपणे काम करेल.खास करून जेव्हा पायचं वॅक्स करायचं असेल तर त्यासाठी शॅम्पू किंवा कंडिशनर वापरलात तर,वॅक्स करण सोप जातं आणि त्वेचेसंबंधी कोणतीही समस्याही उद्भवत नाही.तसेच रेझरचा वापर केल्यानंतर त्वचेवर बॉडी लोशन किंवा एखादी मॉईश्चर क्रिम किंवा एलोवेरा जेल लावलं तरीही त्वचा रखरखीत न राहता मुलायम पडते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button