breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

बिहार निवडणुकांमध्ये गुप्तेश्वर पांडेना टक्कर देणार शिवसेना

बॉलिवूड अभिनेता सुशातं सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर देशभरात प्रचंड राजकारण झाले. या काळात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना बदनाम करण्यात आले. मुंबई पोलिसांवर अनेक आरोप करत तपास सीबीआयकडे देण्यात आला. दरम्यान बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनीही या प्रकरणात उडी घेत मुंबई पोलिसांवर आरोप केले.

आता या सर्वांचा वचपा काढण्यासाठी शिवसेना सच्च झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांमधील उमेदवार गुप्तेश्वर पांडेच्या विरोधात शिवसेनेचा मावळा सज्ज असल्याची माहिती शिवसेना खासदार अनिल देसाईंनी दिली आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये गुप्तेश्वर पांडे निवडणुकी लढवणार आहेत. आता त्यांच्याविरोधात शिवसेना आपला मावळा उभा करणार आहे. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुप्तेश्वर पांडेंनी राजकीय हेतूसाठी मुंबईला बदनाम केल्याचा शिवसेनाचा आरोप आहे. आता याचा वचपा काढण्यासाठी शिवसेना बिहार निवडणुकीत 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये देखील शिवसेनेने 80 जागा लढवल्या होत्या. यामध्ये त्यांनी 2 लाखांपेक्षा जास्त मते घेतली होती. यावेळी शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देणार आहे.

शिवसेना खासदार यांनी मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचे खुलासे केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय घेतला होता. तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यासोबतच बिहार निवडणुकीची रणनीती काय असेल, बिहारमध्ये शिवसेना कोणत्या मुद्द्यावरुन निवडणूक लढवणार, तसेच बिहारमध्ये काँग्रेसच्या विरोधात असणार का अशा अनेक विषयांवर अनिल देसाईंनी भाष्य केले आहे.

बिहारजे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. जेडीयूकडून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले की, डीजीपी पदावरील माणसाचा अभिनय आपण पाहिला, तो कसा बोलत हे आपण पाहिले. त्या पदावर असताना त्यांचे बोलणं हे शोभणारे नव्हते. मात्र आता आमचा मावळा त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहे. त्यांच्याविरोधा आम्ही उमेदवार देणारर आहोत. असे अनिल देसाईंनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button