breaking-newsमुंबई

मुंबईत संशयित दहशतवाद्याला ‘एटीएस’कडून अटक

मुंबई – राज्याच्या दहशतवद विरोधी पथकाने पश्‍चिम उपनगरामधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. काही महत्वाच्या व्यक्‍तींच्या हत्येचा कट हा 32 वर्षीय युवक करत होता. त्याला “एटीएस’च्या जुहूतील पथकाने 11 मे रोजी अटक केली.

यापूर्वी हा संशयित युवक दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शारजा आणि दुबईमार्गे पाकिस्तानलाही जाऊन आला आहे. कराची येथील दहशतवादी प्रशिक्षण तळावर त्याने स्फोटके हाताळणे, अत्याधुनिक शस्त्रे चालवणे आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्याचे तंत्रही शिकून घेतले आहे. मुंबईतल्या दहशतवादी कारवायांसाठी “वॉन्टेड’ असलेल्या एका व्यक्तीने त्याला पाकिस्तानात बोलावून घेतले होते. त्यानुसार हा संशयित शारजामार्गे पाकिस्तानात जाऊन “वॉन्टेड’ व्यक्‍तीला भेटला.

तेथे त्याला काही सामुग्री दिली गेली. पाकिस्तानच्या “आयएसआय’ या गुप्तचर संघटनेचे पाठबळ असलेल्या संघटनेकडून त्याला सहकार्य दिले गेले होते. सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याचा कट त्याच्या दहशतवादी गटाने केला होता, असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे. मुंबईतील काही महत्वाच्या व्यक्‍तींच्या हत्येचा कटही तो करत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संशयिताची अधिक चौकशी सुरू आहे. त्याला स्थानिक न्यायालयासमोर हजर केले असता 21 मे पर्यंत “एटीएस’ची कोठडी सुनावण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button