breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये; शिवसेनेचा फडणवीसांना टोला

सध्या राज्यात सरकारनं वृत्तपत्र सुरू करण्याला परवानगी दिली असली तरी घरोघरी जाऊन वितरण करण्याला मात्र सरकारनं बंदी घातली आहे. यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध करण्यात आला. माजी मुख्ममंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारच्या निर्णयाचा विरोध केला. तसंच वृत्तपत्र सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटल्याचंही सांगितलं. मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये, असं म्हणत शिवसेनेनं त्यांना टोला हाणला आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस सांगतात, ‘वृत्तपत्र वितरणावरील बंदी उठवा. हे बरोबर नाही.’ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमचे निर्णय तुम्ही घेतले आहेत, असं म्हणत शिवसेनेनं त्यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?

महाराष्ट्र सरकारने एक आदेश काढून वृत्तपत्रांना ‘लॉक डाऊन’मधून बाहेर काढले, पण घरोघरी वितरण करण्यावर मात्र निर्बंध घातले आहेत. वृत्तपत्र छपाईला परवानगी, पण वितरणाला बंदी हा ठाकरे सरकारचा अजब फतवा असल्याची टीका सुरू झाली आहे. हा प्रकार म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घाला वगैरे असून या तुघलकी आदेशाविरुद्ध निषेध-आंदोलने करण्याची फर्माने काही पत्रकार संघटनांनी सोडली आहेत. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीदेखील या आदेशाचा फेरविचार करावा व हे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांच्या राज्यघटनेचा संदर्भ देण्यात आला आहे. पण डॉ. आंबेडकरांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकांच्या जिवाशी, आरोग्याशी खेळा, लोकांचे बळी घ्या असेही कोठे घटनेच्या कलमात लिहून ठेवल्याचे सापडत नाही.

लोकांना आपापल्या जीवाची काळजी आहे व सरकार लोकांसाठी काम करीत आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस सांगतात, ‘वृत्तपत्र वितरणावरील बंदी उठवा. हे बरोबर नाही.’ फडणवीस साहेब, मुख्यमंत्री ठाकरे यांना सल्ले देऊ नका. त्यांना त्यांचे काम करू द्या. तुम्ही मुख्यमंत्री होतात. तुमचे निर्णय तुम्ही घेतले आहेत. फडणवीस सांगतात, ‘जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे!’ फडणवीस हे डॉक्टर कधीपासून झाले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे आपल्या मोदी यांचे मित्र आहेत. ट्रम्प बोले मोदी डोले ही स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटना ही बकवास आणि खोटारडी असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी आता जागतिक आरोग्य संघटनेचा निधीच रोखला आहे. तेव्हा मुंबईत बसून कोणी जागतिक आरोग्य संघटनेची ‘तबलिगी’ करू नये.

वर्तमानपत्रामुळे कोरोनाची बाधा होत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगातल्या एकाही देशाने वृत्तपत्रांचे ‘लॉक डाऊन’ केले नाही. मग आपल्याकडेच का? हा प्रश्न आपल्याकडील शहाण्यांना पडला आहे. यातच त्यांचे फाजील शहाणपण दिसून येते. अमेरिकेत वृत्तपत्रांवर बंदी नाही. तेथे आजपर्यंत ४०,००० लोक कोरोनाने मेले. ७ लाख लोक आजही संक्रमित आहेत. इटली, स्पेन आणि युरोपात वृत्तपत्रांवर बंदी नव्हती. तेथे सर्वाधिक हाहाकार झाला. इटलीसारख्या देशात वर्तमानपत्र हातात धरायला पुढची पिढी शिल्लक राहील काय ही भीती आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन व प्रिन्स चार्ल्सही कोरोनाग्रस्त झाले. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य अबाधित असताना त्यांना विजनवासात जावे लागले. ब्रिटनच्या राजवाड्यात व पंतप्रधानांच्या घरी आता वृत्तपत्रांवर निर्बंध आले आहेत, हे आम्हाला दुर्दैवाने सांगावेसे वाटते. वृत्तपत्रांचे वितरण सुरळीत व्हावे व टिळक, आगरकर, अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांचे हे शस्त्र तेजाने तळपत राहावे. हे शस्त्र कोणालाही मोडता येणार नाही, ते बोथट होणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button