breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

मुंबईत परतल्यानंतर ऋषी कपूर पुन्हा एकदा रुग्णालयात दाखलं…

कॅन्सरवर उपचार घेऊन काही महिन्यांपूर्वी भारतात परत आलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी  कपूर हे पुन्हा एकदा रुग्णालयात आहेत. दिल्लीमध्ये चित्रीकरण करत असताना प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना तिथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मंगळवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यानंतर ते लगेचच मुंबईत परतले. मात्र मुंबईत आल्यानंतर ऋषी कपूर यांना ताप येत असल्यानं पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजत आहे. 

कपूर कुटुंबीयांच्या अत्यंत जवळ असलेल्या व्यक्तीनं ऋषी कपूर रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती दिली. सोमवार- मंगळवारी कपूर कुटुंबांत लग्नाचं वातावरण होतं. ऋषी कपूर यांच्या भाच्याचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. त्यावेळी ऋषी कपूर दिसले नाही. मंगळवारी रिसेप्शन पार्टीत देखील ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर आणि त्यांची पत्नी नितू कपूर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांनी  त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button