breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत तरुणीवर गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

मुंबई – मुंबईत २६ वर्षीय तरुणाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या मागे घडलेल्या या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे.

या गोळीबारानंतर काही स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांनाही कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे दाखल होण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची हत्या केल्यानंतर तरुणाने मंदिरात स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोघांचीही ओळख पटली असून राहुल यादव आणि निधी मिश्रा अशी त्यांची नावे आहेत. राहुल हा कांदिवलीचा, तर निधी मालाडची रहिवासी होती. निधीचा दुसऱ्या एका व्यक्तीसोबत साखरपुडा झाला होता. याच कारणामुळे राहुलने तिच्यावर गोळीबार करुन हत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र पोलीस यामागील नेमकं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल जप्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button