breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

फेब्रुवारी महिन्यात १२ दिवस राहणार बँका बंद; RBI ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

 

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

येत्या फेब्रुवारी महिन्यात बँका जवळपास 12 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व बँकेने याबाबत यादी जाहीर केली आहे. या सुट्ट्यांमध्ये रविवारी आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्याया सुट्ट्यांचाही समावेश आहे.प्रत्येक राज्याची संस्कृती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक राज्यातील सण- उत्सव यांचा विचार करून सुट्ट्या जाहीर केल्या जातात. त्यामुळे बँकेत जाण्याआधी बँक सुरू आहे बंद आहे हे एकदा नक्की तपासून घ्यायला हवे.

बँक हॉलिडे कधी आहे?

– फेब्रुवारी 2 – सोनाम लोच्चर (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)

– 5 फेब्रुवारी – सरस्वती पूजा / श्री पंचमी / वसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)

– 6 फेब्रुवारी – पहिला रविवार

– 12 फेब्रुवारी – महिन्याचा दुसरा शनिवार

– 13 फेब्रुवारी – दुसरा रविवार

– 15 फेब्रुवारी- मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागईन्नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)

– 16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद राहतील)

– 18 फेब्रुवारी – डोलजात्रा (कोलकातामध्ये बँका बंद राहतील)

– 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती

– 20 फेब्रुवारी – रविवार

– 26 फेब्रुवारी – महिन्याचा चौथा शनिवार

– 27 फेब्रुवारी – रविवार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button