breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कोरोना संशयित डॉक्टरचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. शहरातील हिंदुजा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

आज मुंबईत एका 85 वर्षीय डॉक्टरचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कोरोनाचे निदान खासगी प्रयोगशाळेत झाल्याने त्यासंदर्भात अद्याप अधिकॉत माहिती मिळालेली नाही. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यामुळे नक्की मृत्यू कशामुळे झाला याची पुष्टी झालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button