breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईत दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण

नवी मुंबई: राज्यात आज दिवसभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील अवघ्या दीड वर्षांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळाच्या इतर तीन कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या चौघांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यापूर्वी कल्याणमधील तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. 

दरम्यान, नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आज नवी मुंबईत परदेशातून आलेल्या ९५ नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या सर्वांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर काहीवेळापूर्वीच वसई-विरारमध्येही कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. पहिला रुग्ण ज्या परिसरात राहत होता त्याचठिकाणी हा रुग्णदेखील वास्तव्याला आहे. हा रुग्ण चार दिवसांपूर्वी दुबईवरून परतला होता. कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर हा रुग्ण खासगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा रुग्णालयात गेला. याठिकाणी चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button