breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘टिक टॉक’वर मुलीच्या व्हिडिओला अश्लिल म्युझीक लावल्याने पाचजणांवर गुन्हा

पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी

‘टिक टॉक’वर मुलीच्या नावे फेक आयडी तयार करून मुलीने बनविलेल्या व्हिडिओला आक्षेपार्ह म्यूझीक लावून तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आलेल्या कॉमेंटमध्ये मुलीला धमकी दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी टिक टॉकचा दुरूपयोग करणा-या पाचजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात एका महिलेने यासंदर्भात तक्रार दिली आहे.

अक्षय साहेबराव म्हसे (रा. लेन नं. 2, पवारनगर, जुनी सांगवी, पुणे), गोविंद पाटील (रा. हिंगोली, सत्यवान झांजे (रा. कात्रज), रोहण कणसे, सुरज जाधव (रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या टिक टॉक आयडीवर अक्षय म्हसे याने त्याच्या @akkysarkar या आडीवरून अश्लील कमेंट केल्या. महिलेच्या व्हॉट्सअप नंबरवर शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय, अक्षयने महिलेचा मोबाईल नंबर त्याच्या अन्य मित्रांना दिला. त्याच्या मित्रांनीही महिलेला अश्लिल मेसेज पाठवले.

आक्षयने मुलीच्या नावापुढे अश्लिल शब्दोपयोग करून टिक टॉकचा नवीन आयडी तयार केला. त्यावर मुलीने बनविलेला तिच्या अकाऊंटवरील व्हिडिओला अश्लिल म्युझीक लावून तो व्हिडिओ नवीन अश्लिल आयडीवरून व्हायरल केला. त्यावर वाकडमध्ये राहणा-या एका महिलेने त्या व्हिडिओला कमेंट केली. त्यावर ”त्याने त्यांना तुझा पत्ता सापडला आहे, माझी पूर्ण टीम घेऊन लवकरच तुझ्या घरी येणार आहे”, असे म्हटले. शिवाय, गोविंदने @bhaiyasahab-patil-2 या आयडीवरून महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार 1 जुलै 2019 पासून ते आजपर्यंत घडला असल्याचे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. यासंदर्भात काल मंगळवारी (दि. 21) रात्री साडेनऊच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button