breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा पनवेलमध्ये आढळला मृतदेह

मुंबईतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह पनवेलमध्ये सापडला आहे. 57 वर्षीय व्यक्ती 10 दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. मृतदेह सापडला तेव्हा अत्यंत वाईट अवस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश्वर उडानी असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. घाटकोपर येथील महालक्ष्मी सोसायटीत ते राहत होते. 28 नोव्हेंबरपासून ते बेपत्ता होते.

राजेश्वर उडानी यांच्या मुलाने पंतनगर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली होती. पोलिसांनी यानंतर त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर 10 दिवसांनी पनवेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटवण्यासाठी कुटुंबाला बोलावलं होतं.

‘कुटुंबीयांनी अंगातील कपड्यांवरुन मृतदेहाची ओळख पटवली आहे’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी कलम 365 (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button