breaking-newsराष्ट्रिय

उद्यापासून हेल्मेटविना पेट्रोल मिळणार नाही

हैद्राबाद: दुचाकी वाहन चालवताना ‘हेल्मेट’चे महत्व सर्वज्ञात आहे. अपघाताच्या वेळी हेल्मेट परिधान केल्यामुळे अनेकांचे प्राण वाचल्याचे किस्से आपण नेहमीच वाचत असतो. अशा प्राणरक्षक हेल्मेटला आपल्यापैकी बहुतेक लोक बगल देताना दिसतात. हेल्मेट वापरणे लोकांच्या अक्षरशः जीवावर येते परंतु याच्यावर तेलंगणा मधील तुरुंग विभागाने नामी शक्कल लढवली असून तुरुंग विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या १३ पेट्रोल पंपांवर आता हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही.
तेलंगणा तुरुंग विभागाचे महासंचालक वि के सिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की “तेलंगणा मध्ये तुरुंग विभागाद्वारे १३ पेट्रोल पंप चालवले जातात. तसेच येणाऱ्या काळात आणखीन ८ पंपांची उभारणी करण्यात येणार आहे. या सर्व पंपांवर आता हेल्मेट असल्याखेरीज पेट्रोल अथवा इंजिन ऑइल मिळणार नाही” तुरुंग विभागाच्या या निर्णयामुळे लोक पेट्रोल भरायच्या निमित्ताने का होईना हेल्मेट तर घालतील एवढा नक्की.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button