breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील चर्नी रोड येथील इमारतीत आगीचे तांडव

मुंबईतील चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या आदित्य अ‍ॅक्रेड या निवासी इमारतीला रविवारी सकाळी अचानक आगीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. इमारतीत अनेक जण अडकले होते, त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.

मुंबईतील चर्नी रोड येथे ड्रीमलँड सिनेमाजवळ असलेल्या आदित्य अ‍ॅक्रेड इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती कळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, इमारतीमध्ये अनेक रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले असून, अजूनही बचावकार्य सुरू आहे. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलांकडून सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ नागरिक अडकले होते. काही वेळानं अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य हाती घेत क्रेन आणि शिडीच्या मदतीनं इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढलं. या दुर्घटनेत सुदैवानं कुणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती सूत्रांकडून आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button