breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम सुरू करा, मनसेची आयुक्तांकडे मागणी


पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी ते निगडी मेट्रो लाईन एकचे विस्तारिकरण करण्याची मागणी अनेकदा केली. मात्र, त्याला पालिका प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. आता पुन्हा मनसेने पिंपरी-ते निगडी मेट्रोचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात मनसेचेच शहराध्यक्ष तथा गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू असून पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम दापोडी ते पिंपरी हे अंतिम टप्प्यात आहे. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या दृष्टीने मेट्रो लाईन 1 ही निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुसरून महापालिकेने पुढाकार घेऊन पिंपरी ते निगडी प्रकल्प अहवाल मार्च 2019 रोजी मान्यता देण्यात आलेली असून तो प्रकल्प अहवाल राज्य शासन व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी व मंजुरीसाठी पाठविण्यात आला.

या प्रकल्प अहवालाची राज्य शासनाच्या मंजुरीनंतर केंद्र शासनाची मंजुरी आवश्यक आहे. परंतु, गेली दोन वर्षे ती मिळालेली नाही. हा प्रकल्प अहवाल केंद्र शासनाच्या दरबारी धुळखात पडून आहे. त्याचा आपण पाठपुरावा करावा. तो मंजूर करून घेण्यात यावा. गेले दोन ते चार वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना निगडीपर्यंत मेट्रो पहिल्याच टप्प्यात व्हावी, यासाठी अग्रही आहे. जर ती नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल.

यावेळी राजू सावळे, युवक अध्यक्ष हेमंत डांगे, बाळा दानवले, दत्ता देवतसे, सुशांत साळवे,  तुकाराम शिंदे, चंद्रकांत दानवले,  निलेश नेटके, रोहित काळभोर,  जय सकट, राजू भालेराव उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button