breaking-newsराष्ट्रिय

ऐश्वर्या रायसोबतचा रोमँटिक फोटो तेज प्रतापने केला शेअर

पटना : राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादवने पत्नी ऐश्वर्या रायसोबतचा एक रोमँटिक फोटो त्याच्या इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. तेज प्रताप आणि ऐश्वर्या परस्परांकडे पाहून नजरेमधून प्रेम व्यक्त करत असल्याचा हा रोमँटिक फोटो आहे.

१५ मे रोजी पाटण्याच्या मैदानावर तेज प्रताप आणि ऐश्वर्याचा शाही विवाह पार पडला. ऐश्वर्या बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात आहे. तिचे वडिल चंद्रिका राय आमदार आहेत. विवाहसोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींसह बॉलिवूडकरांनीही हजेरी लावली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button