breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या महापौरांनी एसआरए सोसायटीतील फ्लॅट लाटला, सोमय्यांचा आरोप; पेडणेकरांचं खुलं आव्हान

मुंबई – अभिनेत्री कंगना रानौतचं कार्यालय अनधिकृत असल्याचं सांगत मुंबई महानगरपालिकेने बुल्डोझर फिरवला. मात्र, त्यानंतर विरोधी पक्ष सक्रीय झाले असून सरकारमधील नेत्यांनी बांधलेल्या आणि हडपलेल्या बांधकामांचा पाढा वाचला जात आहे. त्यातच, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईच्या वरळी भागातील एसआरए सोसायटीमधील फ्लॅट त्यांनी बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

“वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक २ मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक १ मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) हे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावलं आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाखाली एका व्यक्तीला आणि ऑफिस हे गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आलं होतं. आता प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो,” असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी काही कागदपत्रांसहित एक ट्विट केलं आहे.

यापूर्वी आपण शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबईतील अनधिकृत कार्यालयाही भेट दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच म्हाडानं त्यांना यासंदर्भात नोटीस बजावल्याचंही कबुल केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जागा बळकावून अनधिकृत कार्यालय उभारलं असल्याचंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button