breaking-newsमुंबई
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
मुंबई : मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या सुधारत आहे. मुंबईमध्ये कोरोना रूग्ण बरे होण्याच्या दर ७०टक्क्यांच्या पुढे आहे. मात्र आता मुंबईकरांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.
कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांनी ट्विट केले आहे की,माझी कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची कोणतेही लक्षण नाही मी स्वत:ला Isolate केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी अशा मी विनंती करतो.याकाळात मी माझ्या लोकांसाठी घरूनच काम करत राहीन.’