TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे निलख येथे संविधानदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

  • माजी नगरसेविका आरती चोंधे यांचा पुढाकार
  • विद्यार्थ्यांसह पालकांकडून उपक्रमाचे कौतूक

पिंपरी । प्रतिनिधी
भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता पिंपळे निलख येथील महानगर पालिकेच्या शाळा क्रं ५२ येथे भारतीय संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले.

माजी नगरसेविका आरती चोंधे आणि भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या माध्यमातून विद्यार्थांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे साडे आठशे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता युवा मोर्चा अनुसूचित जाती आघाडीचे सहसंयोजक केवल जगताप यांनी केले होते.
यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल, रबर, स्केल, शार्पनर वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला संकेत चोंधे, प्रदीप जगताप, शौबित घाडगे, पवन कामठे, अमित कांबळे, विवेक जगताप, आकाश वाघमारे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  • संकेत चोंधे, शहराध्यक्ष, भाजपा, युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button