breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘मी शिवसैनिक, मी रक्तदाता’, मोहिमेला आजपासून प्रारंभ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे ‘मी शिवसैनिक, मी रक्तदाता’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे. आज शुक्रवार (दि. २७) पासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांनी स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी केले आहे.

याबाबतची माहिती देताना चिंचवडे म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. नियमित रक्तदाते बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक गरजू रुग्णांसाठी, तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी रक्तदात्यांचा तुटवडा भासत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीचे व्यवस्थित नियमन करुन सार्वजनिक मंडळे, धार्मिक, सामाजिक संस्थांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानुसार शिवसेनेतर्फे आजपासून ‘मी शिवसैनिक, मी रक्तदाता’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीच्या सहाय्याने ही मोहिम राबविण्यात येणार आहे तसेच ज्या शिवसैनिकाला वरील रक्तपेढीत पोहचणे शक्य नाही त्यांनी आपापल्या परिसराजवळील रक्तपेढीत रक्तदान करावे. संकटकाळी रक्तदान करणार्या शिवसैनिकांची यादी शिवसेना भवन मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.

वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीत रक्तदान केले जाणार आहे. आज सकाळी नऊ वाजल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मी स्वत: रक्तदान केले आहे. रक्तदान करण्याकरिता नावनोंदणीसाठी शिवसैनिकांना हेल्पलाईन नंबर पिंपरी विधानसभा क्षेत्र राजेश वाबळे, रोमी संधु, अमोल निकम, तुषार नवले, चिंचवड विधानसभा क्षेत्रासाठी गोरख पाटिल, प्रदीप दळवी, विजय साने, सुरेश राक्षे, दिलीप भोंडवे, मावळ विधानसभा क्षेत्रासाठी राजू खांडभोर, डाॅ. विकेश मुथ्था बाळासाहेब फाटक, विशाल हुलावळे, सुनिल हगवणे यांच्याशी त्या त्या परिसरातील शिवसैनिकांनी नावे नोंदवावीत व त्यांनी हेल्पलाईन नं. ९४२२००७०९७ वायसीएम रक्तपेढी संततुकारामनगर विभागप्रमुख राजेश वाबळे यांच्याशी संपर्क साधावा.

गर्दी होणार नाही, याची पुर्णपणे दक्षता घेण्यात येईल. सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाणार आहे. शिवसैनिकाने नावनोंदणी केल्यावर त्यांच्या सोईनुसार आणि रक्तपेढीच्या वेळेनुसार रक्तदान करण्यासाठी शिवसैनिकाला बोलविण्यात येणार आहे. त्यामुळे रक्तपेढीमध्ये कोणीही गर्दी करु नये. पाचपेक्षा जास्त नागरिकांनी रक्तपेढीमध्ये येवू नये, असे आवाहन चिंचवडे यांनी केले आहे.

देशासह महाराष्ट्रावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटसमयी शिवसैनिकांनी  स्वयंस्फुर्तीने या मोहिमेत सहभागी व्हावे, रक्तदान करावे असे आवाहन जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी केले आहे.

रक्तदान करण्यासाठी ‘या’ अटी
रक्तदाता मागील 28 दिवसांमध्ये परदेशातून आलेला नसावा. खोकला, सर्दी, ताप याची लक्षणे नसावीत. सदृढ, निरोगी असावा. रक्तदात्याचे वय 18 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी असावे. मागील रक्तदानास तीन महिने पुर्ण झालेले असावेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button