breaking-newsमनोरंजन

मीना कुमारी यांना गुगलची डूडलद्वारे आदरांजली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांची आज ८५ वी जयंती आहे. या निमित्ताने गुगलने खास डूडल बनवत मीना कुमारी यांना आदरांजली दिली आहे. या डूडलमध्ये मीना कुमारी साडीत असून अतिशय सुंदर दिसत आहेत. शिवाय त्यांचा चेहरा गंभीर दाखविण्यात आला आहे. पडद्यावर तसेच वैयक्तिक जीवनात अनेक समस्या राहिल्याने त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखले जात होते.

मीना कुमारी यांचा जन्म १९३३ साली मुंबईत झाला. त्यांचे खरे नाव महजबीन बानो असे होते. केवळ ६ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा चित्रपटात काम केले. १९५२ साली ‘बैजू बावरा’ या चित्रपटाने त्यांना खरी ओळख दिली. तेव्हापासून त्यांचे नाव मीना कुमारी पडले. या चित्रपटानंतर मीना कुमारी यांनी १९५३ पर्यंत ३ हिट चित्रपट दिले. ज्यामध्ये ‘दायरा’, ‘दो बिघा जमीन’ आणि ‘परिणीता’चा समवेश होता. यातील परिणीता या चित्रपटातील भूमिकेने मीना कुमारी यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. या चित्रपटानंतर त्यांना ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पडद्यावर गंभीर भूमिका साकारणाऱ्या मीना कुमारी यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक समस्या होत्या. त्यांच्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे कमाल अमरोही यांच्याशी मीना कुमारी यांचा विवाह झाला होता. परंतु काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर मीना कुमारी यांना दारूचे व्यसन लागले. पुढे याच कारणाने किडनी संबंधित आजार त्यांना जडला. व ‘पाकिजा’ या चित्रपटानंतर ३१ मार्च १९७२ रोजी त्यांचे निधन झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button