breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मास्क, सॅनिटायझर महाग विकल्यास कारवाई, तपासणी मोहीम सुरु

पुणे |महाईन्यूज|

कोरोना विषाणूने संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असून, पुणे शहरासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉशची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी अनेक ठिकाणी यांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून, नागरिकांची पिळवणूक सुरू आहे. याबाबत पुणे विभागाच्या वैधमापन विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये खास तपासणी मोहीम सुरू केली असून, एमआरपीपेक्षा अधिक पैसे घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात काही तक्रारी असतील तर नागरिकांनी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा सु. बैस यांनी केले आहे.

याबाबत वैधमापनशास्त्र विभागाच्या कोरोना विशेष तपासणी पथकाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात सध्या कोरोनाचा संसर्गजन्य आजार फैलावत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मास्क, सॅनिटायझर, हॅन्डवॉश आदी वस्तूंच्या किमतीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ करण्यात आली आहे. एमआरपीपेक्षा अधिक रक्कम घेणे कायद्यानुसार गुन्हा आहे. यामुळे या कायद्याचा भंग करणाºयांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल, असेदेखील वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

अधिकचे पैसे घेतल्यास येथे संपर्क करा

  • उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र, पुणे विभाग : ०२०- २६६८३१७३/२६६९७२३२
  • सहायक नियंत्रक, पुणे जिल्हा : ०२०-२६१३७११४
  • सहायक नियंत्रक, सातारा जिल्हा : ०२१६२-२३२१४३
  • सहायक नियंत्रक, सांगली जिल्हा : ०२३३-२६०००५३
  • सहायक नियंत्रक, कोल्हापूर जिल्हा : ०२३१-२५४२५४९
  • सहायक नियंत्रक, सोलापूर जिल्हा : ०२१७-२६०१९४९
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button