breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मास्क वापराच्या सक्तीसाठी राजस्थानमध्ये विधेयक सादर

जयपूर – कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याच्या उद्देशाने, सार्वजनिक ठिकाणी मास्क अथवा तोंड व नाक झाकणे अनिवार्य करणारे दुरुस्ती विधेयक राजस्थान सरकारने काल शनिवारी राज्य विधानसभेत मांडले. राजस्थान संसर्गजन्य रोग (दुरुस्ती) विधेयक २०२० संसदीय कार्य मंत्री शांती धारिवाल यांनी मांडले. या कायद्याच्या कलम ४ मध्ये नवे उपकलम जोडण्यात आले असून त्याद्वारे मास्क अथवा आच्छादनाद्वारे चेहरा व नाक योग्यरीतीने झाकल्याशिवाय लोकांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

‘मास्कच्या वापरामुळे कोविड-१९वर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवण्यास आणि लाखो जीव वाचवण्यास मदत होते, असे जगभरातील आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे’, असे या विधेयकाच्या विवरणात म्हटले आहे. सार्वजनिक ठिकाण, कामाचे ठिकाण, सामाजिक व राजकीय मेळावे, तसेच सार्वजनिक व खासगी वाहतूक यांत मास्क घालणे अनिवार्य करण्यात यावे असे राज्य सरकारचे मत आहे, असेही या विवरणात नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button