breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेकडून कायम कर्मचा-यांना दिवाळीचा बोनस, कंत्राटी कामगारांवर मात्र अन्याय

पिंपरी / महाईन्यूज 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कायम कर्मचा-यांना 8.33 टक्के बोनस सह 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले. याबाबतची घोषणा महापौर आणि पदाधिकारी यांनी जाहीर केली. मात्र, कंत्राटी कामगारांना दिवाळी देण्याचा विचार देखील पालिकेने केला नाही. पालिकेच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात कंत्राटी सफाई कामगार महिलांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठेकेदारांनी दिवाळी देण्यास नकार दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेत कंत्राटी पद्धतीने साफसफाईचे काम करणाऱ्या महिलांनी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्याकडे तक्रार केली आहे. कायम कामगारांची दिवाळी गोड होत असतानाच गोरगरीब कष्टकरी महिलांची दिवाळी मात्र अंधकारमय होणार आहे. कायम व कंत्राटी पद्धतीने कामे करणाऱ्या कामगारांना बोनस देणे कायद्याने बंधन कारक आहे. या कायद्याची सर्वत्र अंमलबजावणी होत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मात्र कायदा पायदळी तुडवला जात आहे, असा आरोप बाबा कांबळे यांनी केला आहे.

याबाबत सफाई कामगार महिला संगीता जानराव म्हणाल्या कायम कामगारांना बोनस जाहीर झाला. त्यांचे स्वागत आहे, परंतु आमच्यासोबत सावत्रपणाची वागणूक का ? महानगरपालिका प्रत्येक महिन्यात बीलासोबत ठेकेदारांना बोनसची रक्कम देते. ठेकेदार आम्हाला बोनस देत नसतील तर यावर अंतिम निर्णय प्रशासन घेऊ शकत नाही. मधुरा डांगे म्हणाल्या, आम्ही गलिच्छ अशा ठिकाणी हाताने घाण स्वच्छ करून, शहर स्वच्छ करतो. आमच्याही घरात दिवाळीचा दिवा उजळला पाहि.जे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही.  कांता कांबळे म्हणाल्या, आम्ही आमच्या हक्काचे बोनस मागत आहोत. ते न मिळाल्यास आम्हाला कायदेशीर मार्गाने ते मिळवावे लागेल, कामगार आयुक्तांकडे याबाबत आम्ही तक्रार करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button