breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीमुंबई

Whats App का Down झालं? कंपनीने दिलं स्पष्टीकरण

मुंबई – व्हॉट्सअॅप, फेसूबक, इन्स्टाग्राम काल रात्री अचानक डाऊन झालं. जवळपास ४५ मिनिटे हे प्लॅटफॉर्म ठप्प झाले होते. सोशल मीडिया ठप्प झाल्याने संपूर्ण जग थांबल्यासारखं अनेकांना वाटलं. पण व्हॉट्स अॅप का बंद होतं? ? याबाबत कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

भारतासह बहुतांश देशात काल रात्री म्हणजेची शुक्रवारी 11 च्या सुमारास Whatsapp अचानक बंद झालं. ना कुठेल मेसेज जात होते ना येत होते. व्हिडीओ कॉलिंगही बंद. लोकांनी मोबाईल चालू बंद करुन बघितले पण काहीच उपयोग नाही. शेवटी Whatsapp डाऊन झाल्याचं अधिकृतपणे कळवलं गेलं. मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा व्हॉटसअॅप सुरु झालं. त्यावर कंपनीनं ट्विटरवर पहिल्यांदाच अधिकृतपणे वक्तव्य जारी केलं आहे, त्यात कंपनी म्हणते, तुमची जी असुविधा झाली त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी ती 45 मिनिटं खूप मोठा काळ होता, तुम्ही धैर्य ठेवलंत त्याबद्दल धन्यवाद. पण आता आम्ही परत आलो आहोत.

त्या 45 मिनिटांसाठी फक्त Whatsapp बंद होतं असं नाही तर फेसबूकचं मेसेंजरही बंद होतं आणि इन्स्टाग्रामचंही. म्हणजे SMS ची सवय मोडल्यानंतर फुकटात हे अॅप वापरायची सवय लागलेल्यांना अचानकच जगाशी संपर्क तुटल्याची भावना निर्माण झाली. बराच काळ नेमकं काय घडलं आहे हेच कळंत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत लोकांमध्ये संभ्रम होता. पण Whatsapp, इन्स्टा, फेसबुकवर लोकांचे व्यवसायही अवलंबून आहेत त्यामुळे त्या 45 मिनिटात अनेकांचं मोठं आर्थिक नुकसानही झालेलं आहे.

सिग्नलचे डाऊनलोड्स वाढले

Whatsapp बंद पडताच Signal या अॅपने स्पर्धकाची चुटकी घेण्याची संधी सोडली नाही. Whatsapp बंद पडताच लोकांना पर्याय म्हणून Signal कडे मोर्चा वळवला. त्यांच्या युजर्समध्ये अचानक वाढ झाली. तसा मेसेजच Signal ने केला. सिग्नलच्या युजर्समध्ये मोठी वाढ होते आहे. सर्वांचं ह्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. Whatsapp ची सेवा पुर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्याबाबत सहवेदना. कदाचित टेकच्या जगाबाहेरच्या लोकांना हे कधीच कळणार नाही की, वीकेंड डाऊनटाईम काय असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button