breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाची संघटनात्मक आढावा बैठक

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजपातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघनिहाय संघटनात्मक आढावा बैठका घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. वाल्हेकरवाडी येथे आहेर गार्डनमध्ये शुक्रवारी (दि. 26) सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मावळ आणि शिरुर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 12 मतदारसंघ आहेत. या 12 मतदारसंघांतील पक्षाचा संघटनात्मक आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे या मतदारसंघांतील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button