breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये घरफोडी करणा-या सराईतांना पोलिसांनी दाखविला हिसका

चिंचवड:- चिंचवड येथील हर्षदा सोसायटीतील घरातून सोमवारी ५० तोळे सोने-चांदिचे दागिने आणि काही रोख अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघा सराईतांना ४७ तोळे सोने आणि काही रोख असा एकूण १३ लाख ८२ हजारांच्या ऐवजासह बारातासातच अटक केली. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली आहे.

तडीपार सराईत चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय २६, रा. मोरया हौसिंग सोसायटी, चिंचवड), त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय २२, पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) आणि मित्र कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय २२, रा. पाणी फिल्टर स्टेशनसमोर, पत्राशेड लिंकरोड, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या तिघा सराईतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२९ जुलै) लिंक रोड चिंचवड येथील हर्षदा सोसायटीतील घरातून ५० तोळे सोने-चांदिचे दागिने आणि काही रोख चोरट्यांनी चोरुन नेली होती. या गुन्ह्याचा तपास चिंचवड पोलिस करत होते. यादरम्यान तपास पथकातील पोलीस नाईक सुधाकर अवताडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, चिंचवड येथील तडीपार सराईत घरफोड्या करणारा चोरटा चंद्या हा वाल्हेकरवाडी येथील राजयोग पेट्रोल पंपाजवळ फिरत आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चिंचवड येथील घरफोडी बाबत तपास केला असता त्याने त्याचा भाऊ बिल्डर उर्फ शशिकांत आणि मित्र कम्या उर्फ कमलेश सोबत मिळून हर्षदा सोसायटीतील घरफोडी आणि अंबीका दुकानात चोरी केल्याचे कबुल केले. यावर पोलिसांनी त्याचा भाऊ बिल्डर आणि मित्र कम्या या दोघांना लिंक रोड पत्राशेड समोरील मोकळ्या इमारतीतून अटक केली. तसेच त्यांच्याकडून ४७ तोळे सोने, ४६० रुपयांची नाणी असा एकूण १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज बारातासांच्या आतच जप्त केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, परीमंडळ १ च्या पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, पोलिस हवालदार दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग जगताप, पोलिस नाईक सुधाकर अवताडे, स्वप्निल शेलार, ऋषीकेश पाटील, पोलिस शिपाई नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button