breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

धनगर समाज सेवा संघातर्फे रहाटणीत उद्या राज्यस्तरीय वधु-वर मेळावा

  • जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
  • सुमारे आठ हजार नागरिकांची लाभणार उपस्थिती

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – धनगर समाज सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय वधु-वरांचा अकरावा मेळावा भरविण्यात येणार आहे. हा मेळावा उद्या रविवारी (दि. 6) रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे होणार आहे. या मेळाव्याला वधु-वरांसह सुमारे आठ हजार नागरिकांची उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती धनगर समाज सेवा संघाचे कार्याध्यक्ष दीपक भोजने यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यात पहिल्या रविवारी मेळावा घेण्याची परंपरा धनगर समाज सेवा संघाने जपली आहे. यंदा त्याचे अकरावे वर्ष असून यावर्षी देखील भव्य स्वरुपात हा मेळावा भरवण्याचे नियोजन केले आहे. मेळाव्याचे उद्घाटन जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार गणपतराव देशमुख हे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. प्रमुख पुहणे म्हणून महापौर राहूल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, रामराव वडकुते, गौतम चाबुकस्वार, जगदीश मुळीक, माजी आमदार प्रकाश शेंडगे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, भाजप प्रवक्ते गणेश हाके, डीआयजी दत्तात्रय मंडलीक, सांगलीच्या महापौर संगिता खोत, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, मल्हार सेनेचे सरसेनापती लहू शेवाळे, राष्ट्रवादीचे नेते विठ्ठल काटे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे आदी उपस्थित राहणार आहे.

धनगर समाजातील 1600 वधु-वरांची नोंदणी झाली आहे. तर, कार्यक्रमात 250 ते 300 वधु-वरांची नोंदणी होणार आहे. वधु-वरांसह सुमारे आठ हजार समाजबांधवांची या मेळाव्यात उपस्थिती लाभणार आहे. उपस्थितांच्या स्नेहभोजनाची व्यवस्था कार्याध्यक्ष दीपक भोजने यांच्या परिवारातर्फे करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button