breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी संभाजी महाराजही मैदानात

मुंबई | महाईन्यूज

गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात पाण्याचे असलेले दुर्भिक्ष पाहता, विरोधीपक्षाने यावर गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी एकदिवसीय उपोषण केल्यानंतर आता राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी देखील मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देण्यास आपण तयार असल्याचे म्हटलेले आहे.

मराठवाड्याचे दु:ख कृष्णा खोऱ्यातील हक्काच्या पाण्यामुळे कमी होणार असेल आणि येथील शेतकरी समृद्ध होणार असेल तर मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देण्यास तयार असल्याची ग्वाही संभाजी राजे यांनी दिलेली आहे. तसेच मराठवाड्याच्या पाण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित प्रयत्न करू अस आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळावर काम होईल, अस चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button