breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माथाडी कामगार संघटनेचे नेते झळकळे एकाच बॅनरवर

मुंबई –   माथाडी कामगार संघटनेने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांचे एकाच बॅनर लावून शुभेच्छा दिल्याने याबाबत सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक स्वर्गीय आण्णासाहेब पाटील हे आहेत. त्यांच्या काळापासून काँग्रेसेच्या झेंड्याखाली माथाडी संघटना होती.  त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेच्या झेंड्याखाली होती. या संघटनेतील पदधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संघटनेत राजकीय फूट पडली. आणि नरेंद पाटील भाजपाच्या वाटेवर गेले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर त्यांची वर्णी लागली.  तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असे राजकीय गणित माथाडी संघटनेत सुरू झाले. यामुळे माथाडी कामगार संघटनेत दोन पक्षाचे नेते असल्याने आणि त्यांच्या नेत्यांचा एकाच दिवशी वाढदिवस आल्याने माथाडी कामगार संघटनेने दोन्ही नेत्यांचे फोटो लावून संघटनेच्या नेत्यांकडून एकाच बॅनरवर शुभेच्छा दिल्या. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची शुभेच्छांची बॅनरबाजीचा विषय चांगलाच चर्चेला उधाण आले आहे.

सध्यस्थितीत माथाडी संघटनेत दोन गट पडले आहेत. एका गट आमदार शशिकांत शिंदे आणि दुसरा गट नरेंद्र पाटील यांचा तयार झाला. या गटातटाच्या राजकारणामुळे संघटनेत फुट पडू लागली होती. बॅनेरबाजी देखील झाली. मात्र कुणी कुठल्या ही पक्षात गेला तरी माथाडी संघटनेत राजकारण नको, संघटना संघटनाच राहिली पाहिजे, असा निर्णय घेतला गेला.  प्रत्येकांने आपआपल्या पक्षाचे काम करावे, मी माझ्या पक्षाचे काम करेन यावर माथाडी भवनात बैठक झाली. एकाच व्यासपीठावर शिंदे, पाटील एकत्र आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button