breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माढा लोकसभेसाठी भाजपकडून संजय शिंदेच्या नावाची चर्चा, रणजितसिंह मोहिते-पाटील वेटिंगवर

सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुखांसह भाजपकडून इतरही काही नावांची चाचपणी सुरू आहे. यातच आता भाजपकडून माढ्यात संजय शिंदे यांच्या नावाचाही विचार असल्याची माहिती आहे.

संजय शिंदे यांनी मंगवारी रात्री महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. संजय शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली आहे.

राष्ट्रवादीने जर प्रभाकर देशमुख किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली, तर सुभाष देशमुख किंवा संजय शिॅदे यांच्यापैकी एकाला मैदानात उतरवण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. मात्र भाजपमध्ये अद्याप कोणत्याही नावावर एकमत झालेलं नाही.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने आता वेटिंगवर ठेवल्याचं चित्र आहे. रणजित सिंह हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, मी वैयक्तिक कामासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे, असा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला आहे.

रणजितसिंह भाजपच्या गोटात दाखल झाले तर हा राष्ट्रवादीसाठा मोठा धक्का असणार आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तरीही त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असेल, तर राष्ट्रवादीची मोठी गोची होऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button