breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा सोमवारपासून ७ दिवसांसाठी लाॅकडाऊन! पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा

कोल्हापूर| कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आणि कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवार पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने चिंता.आज दिवसभरात जिल्ह्यात २०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत १६५० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासनाने लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.याआधीसुद्धा सातारा, पुणे,रायगड,ठाणे यांसारख्या काही जिल्ह्यांमध्ये लाॅकडाऊन करण्यात आला आहे. कोल्हापूरमध्ये लाॅकडाऊन काळात औषध आणि दूध पुरवठा यांना दिली जाईल .इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button