breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
माजी सरपंचानं राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या
पुणे – खेड तालुक्यातील भांबोलीचे माजी सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रदीप ज्ञानेश्वर नवरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भांबोली हे गाव भामा खोऱ्यात आहे. प्रदीप ज्ञानेश्वर नवरे यांनी राहत्या घरातील शेडमध्ये रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.