breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचे एकाच वेळी शिंदे आणि फडणवीसांना खोचक टोले

मुख्यमंत्री बोलत असताना भाजपचा एकही टाळी वाजवत नव्हता

नागपुर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. अजित पवारांनी केलेलं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सत्ताधाऱ्यांना मारलेले टोले नेहमीप्रमाणेच यंदाही चर्चेचा विषय ठरले. विधानसभेत भाषण करत असताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही एकाच वेळी खोचक शब्दांत टोले लगावले.
मुख्यमंत्री बोलत असताना किंवा घोषणा करत असताना भाजपचा एकही आमदार टाळ्या वाजवताना दिसत नव्हता. आज सत्ताधारी पक्षातले दोन आणि विरोधकांचा एक असे तीन प्रस्ताव होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा दोघांनी मिळून त्याचं उत्तर दिलं. मी बघत होतो. उपमुख्यमंत्री प्रत्येकवेळी आक्रमकपणे मुद्दा मांडतात. टाळ्या घेतात. सगळे बाकडी वाजवत असतात. देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे. मी बघितलंय. जेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते, तेव्हा एकही भाजपावाला टाळी वाजवत नव्हता. तुम्ही टीव्हीवर बघा. तानाजीराव गेले, तेव्हा तर त्यांनी आमच्याच लोकांना सांगितलं की टाळ्या वाजवा, असं अजित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस तुम्हीही पाच वर्षं मुख्यमंत्री होता. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, करोडोंचे प्रस्ताव आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. सगळ्यांनी मिळून किती टाळ्या वाजवल्या हो? तुमचा तर चेहरा मी सारखा बारकाईनं बघत होतो. तुम्ही इतके अस्वस्थ होत होता. माझं तुमच्याकडेच लक्ष होतं. कारण सगळ्यात जवळ इथून तुम्हीच आहात. बाकीचे सगळे लांब आहेत, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
तुम्ही १३ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बोलण्याकडे बघत असतो. कॅमेरा तुमच्याकडे असतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा महाराष्ट्रासमोर असतो. कारण ते अगदी जवळ बसलेले असतात. तुम्ही जेव्हा बोलत असता, तेव्हा यांची प्रतिक्रिया काय येते ते बघून जे विचार करणारे आहेत, ते वेगळाच विचार करत असतात. तुम्ही पुढच्या वेळी बोलताना यांना तात्पुरतं या बाजूला बसवा आणि तुम्ही एकटेच तिथे बसा. म्हणजे तुमच्या एकट्याचाच चेहरा कॅमेऱ्यात जाईल, असा मिश्किल सल्लाही अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button