breaking-newsमहाराष्ट्र

भाजपवासी नमिता मुंदडांसाठी राष्ट्रवादीच्या माजी नेत्यांची यंत्रणा लागली कामाला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सोडून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेल्या नमिता मुंदडा सध्या अडचणीत दिसत आहेत. राष्ट्रवादीची मते आपल्यासोबत येईल, अशी आशा ठेवून भाजपमध्ये गेलेल्या नमिता यांची वाट धनंजय मुंडे यांच्या झंझावती दौऱ्यामुळे खडतर दिसत आहे. मात्र राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेलेले सुरेश धस आणि रमेश आडसकर मदतीला धावल्यामुळे नमिता यांचे पारडे पुन्हा जड झाले आहेत.

नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेशामुळे केजमधील निवडणूक एकतर्फी होईल अशी शक्यता सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. राष्ट्रवादीने दुसऱ्या फळीतील नेते पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले. याला धनंजय मुंडे यांनी साथ देत साठे यांच्यासाठी आपली ताकत उभी केली आहे. त्यामुळे केजच्या लढतीतील चुरस वाढली आहे.

मतदार संघात वंजारी समाजाचे 80 हजारहून अधिक मतदान आहे. त्यामुळे वंजारी समाजाचे मतदान विजयासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 2014 पासून केज मतदारसंघावर भाजपचे प्राबल्य वाढले आहे. मात्र विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांना डावलून नमिता मुंदडांना उमेदवारी देणे ही बाब विचार करायला लावणारी आहे. अर्थात मतदार संघातील स्थिती भाजपसाठी तितकीशी पोषक नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button