Uncategorized

दिंडोरीमधील राष्ट्रवादीचे आमदार, पेरणी करतानाचा फोटो होतोय व्हायरल

नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. २०१४ नंतर त्यांनी आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला आहे. ६० हजार ८१३ च्या मताधिक्याने झिरवळ सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या भास्कर गावित यांचा पराभव केला. झिरवळ यांच्या या विजयानंतर त्यांचा एक जुना फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये झिरवळ हे शेतात नांगर धरताना दिसत आहेत.

दिंडोरी मतदारसंघामधून राष्ट्रवादीने सलग दुसऱ्यांदा झिरवळ यांना तिकीट दिले होते. झिरवळ यांनी पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत ही जागा मताधिक्य पाचशे पटींनी वाढवत विजय मिळवला. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये झिरवळ १२ हजार ६३३ मतांनी विजय मिळवला होता. यंदा त्यांनी ६० हजारहून अधिकचे मताधिक्य घेतले. या विजयानंतर त्याचा मागील वर्षीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये ते शेतात नांगर धरताना दिसत आहेत. हा फोटो काढला तेव्हाही ते आमदारच होते असं राष्ट्रवादीच्या समर्थकांनी म्हटलं आहे. वनारे येथे आपल्या नावावर ३० एकर जमीन असल्याचे झिरवळ यांनी उमेदवारी अर्जबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले आहे. शेतीबरोबरच झिरवळ हे पशूपालनाचा जोडधंदाही करतात.

दरम्यान, झिरवळ यांनी शेती हाच आपल्या उत्पन्नाचा प्रमुख साधन असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. झिरवळ हे १९९९ ते २००४ या काळातही आमदार होते. त्यावेळी ते पहिल्यांदा निवडून आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button