breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलेचा मृत्यू; द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

आकुर्डी रेल्वेस्थानक परिसरात विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पसरला आहे. त्यावरून दुचाकी घसरून पडल्याने महिला जखमी झाली. त्याच वेळी भरधाव मोटार त्यांच्या डोक्‍यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केला.

चिखलीतील सरस्वती शिंदे (वय ५६) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने, भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आयुक्त हर्डीकर यांनी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांची चौकशी समिती नियुक्त केली. तीन दिवसांत त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

दिव्यांगासाठी स्वतंत्र सहायक आयुक्त….

राज्य सरकारच्या सूचनेनुसार दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नियुक्ती करण्याचा ठराव विधी समितीने सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. सध्या पालिकेच्या धोरणानुसार, दिव्यांगांशी विवाह करणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे. छोटा उद्योग उभारण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज आणि व्हीलचेअर, काठी आदी साहित्य खरेदीसाठी दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेत स्वतंत्र सहायक आयुक्तपदी संभाजी ऐवले यांची नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. सध्या ते नागरवस्ती विभागात समाजविकास अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button