breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त वाकडमध्ये कराटे स्पर्धा संपन्न

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या सोशल फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 9)) वाकड येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय खुली कराटे स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेचे उद्‌घाटन शहराध्यक्ष शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, शंकर मांडेकर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंखे आणि शंकरराव वाकडकर, तानाजी हुलावळे, दिलीप हुलावळे, विशाल काळभोर, मयुर जाधव, हर्षवर्धन भोईर, कुणाल थोपटे, निलेश निकाळजे, विशाल पवार, विनायक काळभोर, भागवत जवळकर, अमोल पाटील, काशिनाथ तेलंगे आदी उपस्थित होते.

स्पर्धेला शहरासह राज्यभरातून स्पर्धक आले होते. सातशेहून जास्त स्पर्धकांचा सहभाग होता. प्रथम क्रमांक ड्रॅगन मार्शल आर्ट (पुणे), व्दितीय क्रमांक ऑल कराटे चँम्पियन अॅकेडमी (नाशिक), तृतीय क्रमांक डिफेन्स स्पोर्टस ॲकेडमी (पिंपरी चिंचवड) यांनी मिळविला. विजेत्यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र व पदक देऊन देण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button