breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीतील रुग्णसंख्या पोहोचली 17 हजारांच्या पुढे;आज 763 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

सांगली – सांगलीत कोरोनाचा उद्रेक कायमच आहे. आज जिल्ह्यात तब्बल 763 जणांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर 27 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 17 हजार 25 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 7 हजार 300 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 660 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 9 हजार 65 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. रोजच सुमारे जिल्ह्यात शेकडोंच्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने सांगलीकरांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button