breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे पुण्यात निधन

पुणे |महाईन्यूज|

ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी चेअरमन ऍड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तीन ते चार दिवसांपासून उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी, असा परिवार आहे. आव्हाड यांच्या जाण्याने शहरातील वकील वर्गातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड हे त्याांचे धाकटे बंधू आहेत. केवळ वकिलीच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव आव्हाड यांची ओळख होती. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख चिंतनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्काराने गौरवले होते.

विद्यार्थ्यांकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांना कायद्याचे धडे देणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक हरपल्याने पुणे शहरातील त्यांच्या वकील विद्यार्थ्यांवर आव्हाड यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button