breaking-newsक्रिडा

महिला कुस्तीपटू विनेश फोगाटची करोनावर मात

भारताची आघाडीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने करोनावर मात केली आहे. २९ ऑगस्ट रोजी विनेशचा करोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. याच कारणासाठी तिने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या करोनाची कोणतीही लक्षणं आढळून आलेली नसली तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वतःला क्वारंटाइन करत असल्याचं विनेशने जाहीर केलं होतं.

यानंतर क्वारंटाइन कालावधीत विनेशच्या दोन करोना चाचणी करण्यात आला. ज्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. विनेशने याबद्दल सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. अहवाल निगेटीव्ह आला असला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून पुढचे काही दिवस आपण क्वारंटाइनमध्ये राहणार असल्याचं विनेशने जाहीर केलंय.

लॉकडाउन पश्चात कुस्ती महासंघाने आपल्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय कँपची घोषणा केली होती. परंतू कँपमधील व्यवस्थेवर बोट ठेवत विनेशने घरीच सराव करणं पसंत केलं होतं. यानंतर कुस्ती महासंघालाही आपला कँप रद्द करावा लागला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button