breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 179 जणांना कोरोनाची लागन, चारजणांचा मृत्यू

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आज दिवसभरात 192 जणांची कोरोना टेस्ट पॉझीटिव्ह आली आहे. तर, चारजणांचा कोरोना विषाणुने मृत्यू झाला आहे. शहरात एकूण 92 हजार 159 जणांना कोरोना विषाणुची बाधा झालेली आहे. त्यातील 88 हजार 179 जणांनी त्यावर मात केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट डिसेंबर 2020 मध्ये येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, कालच्यापेक्षा आज रुग्णसंख्येचे प्रमाण कमी दिसून येत आहे. आज दिवसभरात 192 जणांच्या चाचण्या पॉझीटिव्ह आल्या आहेत. तर, चारजणांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 92 हजार 159 जणांना कोरोना विषाणुची बाधा झाली. त्यातील 88 हजार 179 जणांनी त्यावर मात केली. तर, 1 हजार 628 जणांचा मृत्यू झाला. पालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी 1 हजार 177 घरांना भेटी दिल्या. 3 हजार 920 जणांचे सर्वेक्षण केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button