breaking-newsराष्ट्रिय

महिला आरक्षणाबरोबरच कॉंग्रेसने ट्रिपल तलाक विधेयक पास करावे-भाजपा

नवी दिल्ली: महिला आरक्षणाबरोबरच कॉंग्रेसने ट्रिपल तलाक विधेयक पास करावे अशी सूचना भाजपाने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केली आहे. कायदा मंत्री रविशंकर यांनी राहुल गांधी यांना या संदर्भात पत्र पाठवले आहे. 16 जुलै रोजी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून18 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पास करण्याची मागणी केली आहे. या विधेयकात लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षणाचे प्रावधान आहे. राहुल गांधींच्या या मागणीला उत्तर देताना महिला आरक्षणाबरोबरच कॉंग्रेसने ट्रिपल तलाक आणि निकाह हलालासारख्या मुद्यांवरील विधेयकाचे समर्थन करावे असे भाजपाने सुचवले आहे.
महिला समानता आणि त्यांची योग्य भागीदारी यासाठी भाजपा आणि कॉंग्रेसने एकत्र यावे अशी आपली इच्छा असल्याचे कायदा मंत्री रविशंकर यांनी राहुल गांधींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ट्रिपल तलाक आणि निकाह हलाला यांचा संबध केवळ मुस्लिम महिलांच्या अधिकाराशी नाही, तर तो त्यांच्या अत्मगौरवाचा प्रश्‍न आहे. महिला आणि त्यांचे अधिकार याबाबत कॉंग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने दुहेरी भूमिका घेऊ नये,असे रविशंकर यांनी म्हटले आहे. ही विधेयके पास होण्यासाठी कॉंग्रेस आणि त्याच्या सहकारी पक्षांनीही सहकार्य करावे आणि संसदेच्या कामात अडथळे आणू नयेत, असे रविशंकर यांनी राहुल गांधीना लिहिले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button