breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबई आणि परिसरात दोन दिवसांपासून पावसाने चांगला जम बसवला असून पुढील दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शुक्रवारी २६ जुलैला मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच दिवशी दक्षिण आणि उत्तर कोकणातदेखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण कोकणात शनिवार आणि रविवारी काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्य़ांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील चारही दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे, मात्र मराठवाडा, विदर्भात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील.

दमदार नोंद..

मुंबईत मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने पकडलेला जोर बुधवारी दिवसभर टिकून होता. उपनगरांपेक्षा शहरातील पावसाचे प्रमाण अधिक राहिले. बुधवारी सकाळी ५.३० वाजताच्या नोंदीनुसार हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रावर १७१ मिमी, तर सांताक्रूझ येथे ५८ मिमी पाऊस झाला. बुधवारी दुपारी पावसाचा जोर मंगळवार रात्रीपेक्षा तुलनेने कमी झाला. बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता सांताक्रूझ केंद्रावर २९.२ मिमी, तर कुलाबा केंद्रावर ३६.९ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी अडीच वाजेपर्यंतच्या सहा तासांत कुलाबा, दादर, चेंबूर, कुर्ला, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, घाटकोपर, पवई, मुलुंड, ठाणे, ऐरोली, नेरुळ, मुंब्रा या ठिकाणी २० ते ४० मिमी पावसाची नोंद झाली. या काळात शहरातील अनेक भागांत १०-२० मिमी पावसाची नोंद झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button