breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महानगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन लागू, फटाके वाजवून निर्णयाचे स्वागत

  • महानगरपालिका आवारात फटाके वाजविल्याने गुन्हा दाखल व्हायचा थांबला

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवडसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी (दि.23) घेतला. महापालिकेतील सुमारे आठ हजार कर्मचारी, अधिका-यांची सातव्या वेतन आयोगामुळे मोठी पगारवाढ मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे कर्मचा-यांकडून फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.

सातव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतन पुनर्रचना समिती आणि कर्मचारी महासंघाच्या शिफारशीनुसार त्यांच्या विविध भत्त्यांमध्ये भरघोस वाढ करण्यात आलीहे. तसा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आलो. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगाचा लाभ महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या कर्मचा-यांना २ सप्टेंबर २०१९ पासून मिळणार आहे.
यापूर्वी पिंपरी महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून फरकाची रक्कम प्रत्येक वर्षाच्या 1 जानेवारी व 1 जुलै अशा पाच टप्यांमध्ये देण्याबाबत निर्णय झालेला आहे. दरम्यान, या निर्णयाचे कर्मचारी महासंघाच्या पदाधिका-यांनी पिंपरी महापालिकेसमोर फटाके वाजवून स्वागत केले. तसेच, शहरातील आमदारांचेही या निर्णयासाठी आभार मानले आहेत.

… अन्ं गुन्हा दाखल व्हायचा थांबला

राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज (मंगळवारी) घेतला. त्या निर्णयाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने फटाके वाजवून स्वागत केले. मात्र, हे फटाके महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वाजविण्यात आल्याने सुरक्षा विभागाने यावर आक्षेप घेतला. सदरील फटाकेमुळे एखादी दुदैवी घटना घडून वित्तहानी होवू शकते, त्यामुळे फटाके वाजविण्यास मज्जाव करण्यात आला होता. तरीही आनंदाच्या भरात कर्मचारी महासंघाच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजविले. त्यामुळे सुरक्षा विभागाकडून त्या कर्मचा-यांवर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु केली. तसेच आयुक्तांना देखील तसे कळविण्यात आले. त्यावर महापालिका कर्मचारी महासंघाच्या पदाधिका-यांनी सदरील घटना अनावधानाने आनंदाच्या भरात झालेली असून यापुढे असे कृत्य करणार नसल्याचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना फोनवरुन कळविले. त्यावर आयुक्तांनी सदरील कृत्य करणा-या कर्मचा-यांनी सुरक्षा विभागाकडून नावे मागितली असून त्यांना समज देण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button