breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गाडगे महाराजांचे कृतीशील योगदान आजही दिशादर्शक – माई ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

समाजमनात मानवतेविषयी संवेदना तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेले कृतीशील योगदान आजही दिशादर्शक असून सशक्त समाज निर्मिती आणि विज्ञानवादी पिढी निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहे, असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज पिंपरी येथील महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे सोमनाथ साबळे, प्रफुल्ल पुराणिक, राष्ट्रसंत गाडगे बाबा सेवाभावी संस्थेचे नरेश कदम, गजानन गवळी, विशाल जाधव, अनिल जाधव, संतोष भालेकर, सुनिल अभंग, प्रशांत दळवी, आकाश जवळकर, किरण लोंढे, कुमार दळवी, राजाभाऊ दळवी, वैशाली राऊत, रंजना अभंग, संतोष शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते आनंदा कुदळे, बाळासाहेब वाघ, राम शिंदे, अभि ठाकरे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button